मुंबई

उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे सेवानिवृत्त

CD

उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे सेवानिवृत्त
घाटकोपरमधील सत्‍कार सोहळ्याला अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्‍थिती
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) ः महापालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून दाखल होऊन सहाय्यक पालिका आयुक्त ते उपनगर उपप्रमुख अभियंता म्हणून तब्बल ३० वर्षे ३ महिने सेवा बजावणारे अधिकारी संजय सोनवणे हे पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ३०) घाटकोपर येथे त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. या वेळी लोकप्रतिनिधी, पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्‍थिती होती.
घाटकोपर पूर्वेकडील ९० फुटी रोडवरील लवेंडर बाग हॉलमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. या वेळी आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते यांच्यासह ईशान्य मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक सुरेश पाटील, राष्टवादी काँग्रेस (शरद पवार)च्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, माजी नगरसेवक बाबा हांडे, राष्ट्रवादीचे अमोल मातेले यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, घाटकोपर एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी संजय सोनवणे यांच्या पालिकेच्या सेवेतील अनेक आठवणी सांगितल्या. सोनवणे हे १ मार्च १९९५ रोजी पालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतर ते ३१ मे रोजी निवृत्त होणार असल्यामुळे नागरिकांनीही या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. या सेवेच्या काळात सोनवणे यांनी सामाजिक जाणीव ठेवत आणि वेळेचा कटाक्ष पाळत कामाची कुशलता दाखवून दिली. या वेळी संजय सोनवणे यांनी सांगितले, की १ मार्च १९९५ रोजी मुंबई महापालिकेत घाटकोपर येथील उपनगर उप अभियंता (रस्ते) कार्यालयातील दुय्यम अभियंता म्हणून सेवेत रुजू झालाे. आता माझी निवृत्तीही याच कार्यालयातून उपनगर उपप्रमुख अभियंता (रस्ते) पदावरून होत आहे. हा योगायोग असला तरी मध्यंतरीच्या काळात आपण अनेक ठिकाणी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचारी आणि इतकेच नाही तर जनतेचीही मर्जी राखून काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT