मुंबई

गोद नदी पात्रात मातीचा भराव

CD

दूषित पाण्यामुळे पेणकरांचे आरोग्य धोक्‍यात
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : पेण शहरात दिवसेंदिवस दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागच्या आठ-दहा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. त्‍यामुळे हेटवणे धरणातील पाणी गढूळ झाले असून पेणकरांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्‍यामुळे पेणकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे.
एकीकडे शहरात नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये तुंबलेली गटारे, कचऱ्याचे ढीग सर्वत्र दिसून येत आहेत. त्‍यातच आता पेणकरांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. मागील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांसह धरणातील पाणी मातीमिश्रित गढूळ झाले आहे. पेण नगर परिषद हेटवणे धरणातून शहराला पाणीपुरवठा करते; मात्र पावसामुळे धरणातील पाणी गढूळ झाले आहे. त्‍यामुळे हे मातीमिश्रित पाणी सध्या पेणकरांना पिण्याची वेळ आली आहे. त्‍यामुळे अनेकांकडून सध्या विकतचे पाणी आणून स्‍वयंपाकसह पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, या मातीमिश्रित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर पेण नगर परिषदेकडून स्‍वच्‍छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध स्तरावरील कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पिण्याचे पाणी अशुद्ध येत असेल त्या ठिकाणी जुनी पाइपलाइन असल्याने तेथील कामे सुरू आहेत. शहराला शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी नवीन फिल्टरेशन प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, लवकरच पेणकरांना शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT