गवळी समाजाच्या वास्तूत चांगली पिढी घडली पाहिजे : खासदार सुनील तटकरे
माणगाव, ता. ३१ (बातमीदार) ः निजामपूरातील श्रीकृष्ण यादव गवळी समाजाच्या वास्तुतून उद्याच्या भवितव्यातील चांगली भावी पिढी घडली पाहिजे, असे प्रतिपादन रायगड - रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. माणगाव तालुक्यातील श्रीकृष्ण यादव गवळी समाज निजामपूर विभाग, या संस्थेच्या नुतन इमारतीचे उदघाटन शुक्रवार ३० मे रोजी खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी खासदार तटकरे यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे पुढे म्हणाले कि, १९४२ मध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व कालावधीमध्ये ही सामाजिक संघटना पूर्वजांनी स्थापन केली. निजामपूरसारख्या या साऱ्या परिसराचे नेतृत्व दीर्घकाळ चंद्रकांत गोपाळ यांनी केले. त्यांनी यादव गवळी समाजाची वास्तू उभी राहावी, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार यादव गवळी समाजाची ही वास्तू दिमाखदार पद्धतीने आज उभी राहिली. आपण सर्वांनी तसेच दानशूर व्यक्तींनी ही इमारत उभी करण्यासाठी सहकार्य केले. शिवाय मलाही या इमारतीसाठी सहकार्य करता आले. या समाज भवनातून दररोज वेगवेगळे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. महिलांसाठी वेगवेगळे व्यवसाय याठिकाणी सुरू झाले पाहिजेत. निजामपूर विभाग हा माझ्या राजकीय जीवनातील नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. औद्योगिक कारणामुळे आपल्या साऱ्या परिसराचे चित्र बदलले आहे. या साऱ्या परिसरात रोजगाराची दालने उपलब्ध करून स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. तर आपल्या प्रास्ताविक मनोगतात बोलताना कासार म्हणाले कि, या सभागृहाला खासदार तटकरे यांनी मोलाचे असे सहकार्य केले आहे. २०१५ मध्ये या वास्तूचे भूमीपूजन झाले. त्यावेळी तटकरे यांनी तुम्ही कामाला सुरुवात करा असे सांगून वस्तूला भरभरून अशी मदत केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पागार यांनी करून उत्साहात कार्यक्रम पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.