ट्रक दुभाजकाला धडकून अपघात
रस्त्यावर ऑईल पसरल्याने वाहतुकीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : घोडबंदर रस्त्याने ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरील मानपाडा उड्डाणपुलाजवळील दुभाजकाला ट्रक जाऊन धडकला. या अपघातात ट्रकमधील ऑईल रस्त्यावर पसरल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जवळपास पाच तासांनी अपघातग्रस्त ट्रक तेथून नेण्यात आला. तर या अपघातानंतर ट्रकचालक तेथून पळून गेला.
ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरील मानपाडा उड्डाणपुलाच्या दुभाजकाला ट्रक धडकून रस्त्यावर ऑईल पसरले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस काकडे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. वाहतूक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी ट्रकमध्ये कोणी नव्हते. तसेच ही घटना शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली होती. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तर अपघातग्रस्त वाहन शहर वाहतूक विभागाचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन क्रेनच्या साह्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आले. तोपर्यंत सकाळचे १० वाजले होते. त्यानंतर रस्त्यावर पसरलेल्या ऑईलवर आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी माती पसरविण्यात आल्यावर घोडबंदर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा केला, अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.