मुंबई

झेडपी घेणार गर्भवतींची काळजी

CD

झेडपी घेणार गर्भवतींची काळजी
जोखीमग्रस्त भागातील गरोदर मातांची यादी तयार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुरामुळे संपर्क तुटतो. तसेच दळणवळणाच्या साधनांचा अभाव व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जोखमग्रस्त भागातील गर्भवतींची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषद सरसावली आहे. अशा जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची यादी तयार केली असून, पावसाचा व प्रसूतीच्या तारखेचा अंदाज घेत त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.

मुंबईशेजारी असून ठाणे जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागल्यास अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटतो. दळणवळणाचे साधनच उपलब्ध होत नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील नागरिकांची गैरसोय होत असते. याची दाखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच एक बैठक घेत ग्रामीण भागात पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना आपत्तीच्या काळात मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूरस्थितीत उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त गाव-पाड्यांची माहिती घेत तेथील गर्भवतींची यादी तयार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण भागातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ३८ गाव-पाडे या जोखीमग्रस्त क्षेत्रात ९१ गर्भवती असल्याची नोंद केली आहे. ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचता यावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा व प्रसूतीच्या तारखेचा अंदाज घेऊन त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.


तालुकानिहाय गर्भवतींची आकडेवारी
तालुका प्रा. आ. केंद्र गावपाडे गर्भवती
मुरबाड ०३ ०४ १२
शहापूर ०५ ०९ २८
भिवंडी ०५ ११ १९
अंबरनाथ ०३ ०६ १३
कल्याण ०२ ०८ १९

पावसाळ्याच्या काळात गरोदर मातांची गैरसोय होऊ नये, यासाठी आशा आणि अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची यादी तयार केली असून, संभाव्य प्रसूती तारीख लक्षात घेत गरजेनुसार त्यांना आरोग्य संस्थांमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.
- रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT