शाळाचालकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी
टिटवाळा, ता. ३१ (वार्ताहर) : केबीके इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात अनधिकृत व धोकादायक भिंत कोसळून एका पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना टिटवाळ्यात घडली. अंश राजकुमार सिंग (वय ११) या विद्यार्थ्याचा जीव गेला असून, इतर दोन मुले गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीची कारवाई करीत शाळेचे चालक सुबराव खराडे यांना अटक केली आहे.
दुर्घटनेनंतर अंशची आई अन्नपूर्णा राजकुमार सिंगने दाखल केलेल्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी गंभीर निष्काळजीच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून कारवाईला सुरुवात केली. शुक्रवारी (ता. ३०) रात्री साडेबारा वाजता खराडे यांना अटक करण्यात असून ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शाळेची धोकादायक संरक्षक भिंत पालिकेच्या अ प्रभागाचे तोडकाम पथक, अग्निशमन जवानांनी शुक्रवारी जमीनदोस्त करून टाकली आहे. ही भिंत बांधण्यासाठी पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी शाळेने घेतली नव्हती, अशी माहिती अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पोलिसांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.