मुंबई

समन्वयाने काम करा

CD

समन्वयाने काम करा
पालकमंत्र्यांकडून रेल्वे रुळावर उतरून कामांची पाहणी


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ‘पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा; एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसू नका. ‘ब्लेम गेम नको’ मान्सूनपूर्व तयारी तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी (ता. ३१) प्रशासनाला दिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूपदरम्यान लोकलने प्रवास करीत रेल्वे रुळावर उतरून कामांची पाहणी केली.

पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी पश्चिम रेल्वे मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीस महापालिका, मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस, म्हाडा, एसआरए, जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अशा विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नालेसफाई, पंपिंग व्यवस्था, धोकादायक झाडांची छाटणी, पर्जन्यजल व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर शेलार यांनी सीएसएमटीहून लोकलने प्रवास करीत मस्जीद, सँडहर्स्ट रोड, भायखळा, सायन, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडूप स्थानकांवर केलेल्या कामांची ट्रॅकवर उतरून पाहणी केली.
मंत्री शेलार म्हणाले, ‘पावसात लोकल सेवेला उशिरा झाल्यास स्थानकांवर गर्दी वाढते. अशा परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलिस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक आपत्कालीन योजना तयार करावी, पर्याय म्हणून बससेवांचा पर्याय तयार ठेवावा. अशा उपाययोजना मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर लागू कराव्यात. रेल्वे, महापालिका, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. मध्य रेल्वेच्या हद्दीत एकूण ८१२ कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी ७५०ची सफाई पूर्ण झाली असून, उर्वरित लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देशही शेलार यांनी मध्य रेल्वेला दिले. तसेच ६३७ धोकादायक झाडांपैकी ५५० झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या असून, बाकी झाडांची छाटणीही लवकर पूर्ण करण्यास सांगितले. मध्य रेल्वेने यंदा उपसा पंपांची संख्या ९६ वरून १७७ वर नेली असून, त्यांची चाचणीही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही या वेळी देण्यात आले.

रेल्वे-मनपात समन्वय हवा
 रेल्वे प्रशासनाने जवळ जवळ ३६ ठिकाणी पुराचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत. त्यापैकी पाच ऑटोमॅटिक  डिजिटल आहेत आणि १२ मॅन्युअल आहेत. यांचा  समन्वय पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणे आवश्यक आहे. कारण रेल्वे रुळावर पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा याचे मोजमाप रेल्वे यंत्रणा करते; पण पंप लावून ते पाणी बाहेर टाकणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या आणि नाल्यांची व्यवस्था महापालिका करते. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वय साधण्याबाबत आशीष शेलार यांनी निर्देश दिले.

धोकादायक इमारतींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार
मस्जीद व सँडहर्स्ट रोड रेल्वेदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत २४ धोकादायक इमारती असून, याप्रकरणी मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांना माहिती देऊन निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याचेही या वेळी पालकमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards 2026: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; भगतसिंह कोश्यारी, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश

Chanakya Life Guide : 'या' 2 सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणच फसवू शकणार नाही

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT