मुंबई

शेती अवजारांची दुरुस्ती सुरू

CD

विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार) : यंदा लवकरच पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतीपूर्वी शेतात मशागत, राबणीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांच्या दुरुस्ती, डागडुजी करणे, यासाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी सुताराकडे बसून अवजारांची दुरुस्ती करून घेत आहेत.
सद्यस्थितीत शेतीपूर्वी अन्य कामे ट्रॅक्टरच्या साह्याने केली जात असली, तरी वाढती लोकसंख्या, विभिन्न कुटुंब पद्धतीमुळे शेतीच्या तुकड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यांत्रिक शेती खर्चात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. बारा बलुतेदारांपैकी सुतार, लोहार हा घटक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या आधुनिक यंत्र युगातही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. वर्षभर शेतीसाठी लागणारे लाकडी अवजारे बनविण्याचे काम तो करतो. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून धान्य स्वरूपात आसामी त्याला पूर्वी दिली जात होती. आता त्यात बदल होऊन रोख रकमेच्या स्वरूपात आसामी दिली जात आहे.
वाढती महागाई, बियांची वाढलेली किंमत मजूर मिळत नाही. मिळाले तर त्यांची मजुरी परवड नाही. म्हणून शेतकरी वर्ग कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बारा बलुतेदारांवर परिणाम झाला आहे. बारा बलुतेदारांनी आपले पारंपरिक व्यवसाय सोडून अन्य उपजीविकेचे मार्ग स्वीकारले आहेत. परिस्थितीत बदल होत असला तरी इतरांनी आपला सुतारकाम व्यवसाय परंपरेनुसार जोपासला आहे, असे चित्र विक्रमगड व ग्रामीण भागात पाहावयास मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT