मुंबई

भाषा हे संवादाचे माध्यम : आशीष शेलार

CD

भाषा हे संवादाचे माध्यम : आशीष शेलार

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) : ‘भाषा हे संवादाचे माध्यम आहे; संघर्षाचे नाही. भाषा लोकांना एकत्र करण्याचे काम करीत आली आहे. भाषेचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी करू नये. भाषेच्या नावाखाली द्वेष पसरवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घ्यावी,’ असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. ३०) सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व सभागृहात हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त हिंदी सेवा सन्मान समारंभात ते बोलत होते. ‘हिंदी ही मुंबईची सामान्य भाषा बनली आहे. असे असूनही काही लोक आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाषेच्या नावाखाली द्वेष पसरवतात. मुंबईत ज्याला हिंदी येते तो मराठीही जाणतो आणि ज्याला मराठी येते तो हिंदीही जाणतो. हिंदी आणि मराठीतील समन्वयाचा परिणाम म्हणून महायुती सरकार चालवले जात आहे.’ या वेळी माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी, आमदार राजहंस सिंह, संजय उपाध्याय, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Ranjani Cable Theft Case: रांजणीच्या खडकवाडीत केबलचोरीचा कहर; ५५ शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान, पोलिस तपासाची मागणी तीव्र

SCROLL FOR NEXT