मुंबई

पोलादपूरमध्ये आपत्ती निवारणसाठी यंत्रणा सज्ज!

CD

पोलादपूरमध्ये आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज!
पर्जन्यमान सर्वाधिक असल्याने शहराला पुराचा धोका
पोलादपूर, ता. १ (बातमीदार) ः मे महिन्यात पावसाने दाणादाण उडवली असून, राज्यातील काही भागात नैसर्गिक आपत्ती घडली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह जिल्हा स्थानिक पातळीवर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी आपत्ती निवारण आराखडा व मार्गदर्शक सूचनांना गती देणे गरजेचे बनले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या हंगामात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील काही ठिकाणी पडलेले वृक्ष व रस्त्यावर आलेली माती प्रशासनाने तातडीने दूर केली असली तरी येणाऱ्या पावसात यंत्रणा सुसज्ज असणे क्रमप्राप्त बनले आहे.
पोलादपूर तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका असून, अनेक कातकरी, धनगर कुटुंबे उंच डोंगरात कड्या कपारीत वास्तव्य करतात. वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५०० ते ४००० मि.मि. पाऊस, तसेच महाबळेश्वर पर्वतरांगात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला येणाऱ्या पुरामुळे येथील जनजीवन विस्‍कळित होते. तसेच दरड कोसळण्यासारख्या आपत्तीही घडतात, शिवाय मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत असते. पोलादपूर तालुका हा रायगड जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने संपूर्ण डोंगरी म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळे व २० तलाठी सज्जे मिळून ८८ गावांमध्ये २१२ वाड्यांचा समावेश होतो. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४५ हजार ४६४ एवढी आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीलगत महाड, खेड, या दोन तालुक्यांची व सातारा जिल्ह्यातील हद्द जोडून आहे. तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच एकमेव व्यवसाय असून, भात हे प्रमुख पीक आहे. तालुक्यामधून सावित्री ही एक प्रमुख नदी वाहते. त्यांच्या काठावरील एकूण चार गावांना कमी अधिक प्रमाणामध्ये पुराचा धोका संभवतो. तसेच याशिवाय तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६- (मुंबई-गोवा) रस्ते अपघाताची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. १९८९, २००५ व २०२१ रोजी अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यात अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती. तथापि आगामी आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्राम स्तरावरील अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे गरजेचे झाले आहे.
...................
पावसाळी हंगामात २४ तास नियंत्रण कक्ष तालुकापातळीवर कार्यन्वित करणे, आवश्यक तेथे सुरक्षित ठिकाणी तात्पुरते निवारे उभारणे. स्वयंसेवी संस्था व इतर यंत्रणा यांच्याशी संपर्क साधून आपत्तीकालीन नियोजनात सहभागी करून घेणे. पुराची पूर्वसूचना मिळताच गावपातळीवरील संघटनामार्फत तातडीने संदेश पोहोचविणे व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन करणे. पंचनामा टीम तयार ठेवणे. पर्यायी संपर्क यंत्रणेबाबत समन्वय करणे. धरण व पावसाचे पाण्याबाबत लगतचे जिल्ह्यातील प्रशासन व यंत्रणांनाही समन्वय ठेवणे, संपर्क तुटणाऱ्या गावांचा शोध घेऊन योग्य त्या उपाययोजनेचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे. त्‍यानुसार स्‍थानिक आपत्ती व्‍यवस्‍थापनाच्या माध्यमातून यंदादेखील लक्ष ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT