मुंबई

रेल्वेच्या सुरक्षेला वादाचे ग्रहण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : रेल्वेच्या हद्दीत घातपाताच्या घटनांच्या नोंदी करण्यावरून रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांमधील अभाव उघड झाला आहे. रेल्वेच्या स्थानिक पातळीवरील एका बैठकीत हा वाद प्रखरतेने दिसून आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला वादाचे ग्रहण लागले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे. याचदरम्यान ठाणे ते कळवा स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळालगत सिमेंट पोल ठेवण्यात आला होता. या प्रकारातून घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली, मात्र आरपीएफने हा गुन्हा नोंदवण्यासाठी जीआरपीला सांगितले. यातूनच वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे जीआरपीने गुन्हा दाखल करताना तपास सुरू केला. तोच दिघा आणि तुर्भे दरम्यान पुन्हा रेल्वे रुळालगत झाडाचा ओंडका ठेवण्यात आला होता. या दोन्ही घटनांनंतरही ठाणे आरपीएफने गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्या वेळी तुर्भे आरपीएफने याबाबतचा गुन्हा नोंदवून घेतला. अशातच ठाणे रेल्वे स्थानकावरील शौचालयाची तोडफोड झाली. या घटनेत आरपीएफने गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केली, पण रेल्वेस्थानकातील मालमत्तेची तसेच रेल्वेची जबाबदारी आरपीएफची असल्याने अखेर याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. याचदरम्यान रेल्वेच्या स्थानिक पातळीवर सुरक्षासंदर्भात बैठक झाली. या वेळीही दोन्ही यंत्रणांमधील गुन्हा नोंदविण्यावरून होणारा वाद समोर आला आहे.
-------------------------------------------------
जबाबदारी ढकलण्याचे काम
ठाणे रेल्वेस्थानकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपाठोपाठ ठाणे रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ आहे. दररोज सुमारे आठ ते १० लाख प्रवासी येथून प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाण्यात रेल्वे सुरक्षा बळ (आरपीएफ) आणि लोहमार्ग सुरक्षा बळ (जीआरपी) अशा यंत्रणात तैनात आहेत. या यंत्रणांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे, मात्र कामाची जबाबदारी झटकून यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करत असल्याने प्रवाशांची वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT