मुंबई

इमारत दुरुस्‍ती कामात गैरव्यवहार

CD

खारघर, ता. १ (बातमीदार) : वाशी सेक्टर १५ येथील जुहूनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारत दुरुस्तीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळले आहे. याबाबत संस्थेचे पदाधिकारी व समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सिडकोचे उपनिबंधक प्रताप पाटील यांनी दिले आहेत.
वाशी सेक्टर १५ येथील जुहूनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद गणेश पेडामकर व भाग्येश चव्हाण यांनी संस्थेच्या इमारत दुरुस्तीच्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सिडकोच्या उपनिबंधक सहकारी संस्थेकडे केली होती. याची दखल घेत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधक बी. के. परब यांची नियुक्ती करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत तत्कालीन पदाधिकारी व समिती सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्याचे आढळले. इमारत दुरुस्तीच्या कामामध्ये ३३ लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्‍याचे समोर आले आहे. संस्थेचे पदाधिकारी व समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सिडकोचे उपनिबंधकांनी दिल्‍याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवे शिक्षणमंत्री B.A पास , प्रल्हाद जोशींची संपत्ती किती? कोट्यवधींचे मालक तरी ना कार, ना बाइक

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

Tembhu Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! टेंभूला ६९१ कोटी, म्हैसाळ-ताकारीला ९१९ कोटींचा निधी

Pune News: ६ कोटींचे काम रखडले; एम्प्रेस गार्डनसमोरील 'प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह' खड्ड्यांच्या विळख्यात

SCROLL FOR NEXT