पनवेल, ता. १ (वार्ताहर) : पनवेल रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेत सुटका केली आहे. तसेच बाळाचे अपहरण करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिने भीक मागण्यासाठी बाळाचे अपहरण केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ३च्या सुमारास पनवेल रेल्वेस्थानक परिसरातून एका तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. घाबरलेल्या अपहृत बाळाच्या आईने सर्वत्र शोध घेत अखेर पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाच विशेष पथके नियुक्त केली. या पथकाने रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक महिला बाळासह पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसताना दिसली. त्यामुळे पथकांना कर्जत, लोणावळा, दौंड आणि पुणे येथे रवाना करण्यात आले. याचदरम्यान आरोपी महिला लोणावळ्याहून पुन्हा पनवेलकडे परतत असल्याचे निदर्शनास आले. माहितीच्या आधारे पनवेल शहरासह आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. महिला बाळाला घेऊन कळंबोली परिसरात गेली असताना, कळंबोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक तृप्ती शेळके या कळंबोली फायर ब्रिगेडजवळ कर्तव्यावर असताना त्यांना महिला बाळासह आढळली. त्यांनी महिलेला तत्काळ ताब्यात घेत बाळाची सुखरूप सुटका केली.
भीक मागण्यासाठी बाळाचे अपहरण
बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेचे नाव रोशनी विनोद वागेश्री (३५) आहे. ती पनवेल रेल्वेस्थानकासमोर झोपडपट्टीत राहात असून, भीक मागण्यासाठी तिने बाळाचे अपहरण केल्याचे चौकशीत उघडकीस आले. पनवेल शहर पोलिसांनी रोशनीला ताब्यात घेऊन बाळाला आईच्या स्वाधीन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.