मुंबई

व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा

CD

व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा
आरोपीला पोलिसांकडून अटक
भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : मोबाईल ॲक्सेसरीजची विक्री करणाऱ्या व्यवसायाला ७० लाखांच्या कर्जाचे प्रलोभन दाखवून त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल सहा कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. याप्रकरणी २४ जणांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. नरपतकुमार चौधरी (२६) असे फसवणूक झालेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. सूरजपाल सिंह अजितसिंह चौहान, असे आरोपीचे नाव आहे.

नरपतकुमार चौधरी यांनी भिवंडी शहरात सप्टेंबर २०१९ मध्ये मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीचे दुकान सुरू केले होते. दुकानातील साहित्य खरेदीनिमित्त जी पॉवर एंटरप्राइजेस या कंपनीचे सूरजपाल सिंह चौहान यांच्या संपर्कात आले होते. २०२० मध्ये स्वतःची ॲक्सेसरीज बनवणारी कंपनी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी ७० लाख रुपयांचे इंजेक्शन मोल्डिंग मशीन खरेदीसाठी ६३ लाखांच्या कर्जासाठी सूरजपाल सिंह चौहान यांनी मदतीचे आश्वासन दिले. अजितसिंह चौहान, विक्रमसिंह चौहान, महिपालसिंह चौहान, राजेश कुमार कोहर, चार्टर अकाउंटट करण अशोकलाल रांका, वसंत दवे, जगमालसिंह शिवसिंह, जोगडिंह चौहान, तनवीरसिंह, केसरसिंह दहिया, लालसिंह दहिया, मदनसिंह राव,महेंद्रसिंह, महावीर कोठारी, नरपतसिंह चौहान, शेवनकुमार सुधार, संगीता, पुनीत गुप्ता, दिनेशकुमार चौधरी, हंजाराम चौधरी, हरसनराम देवासी व बळवंतसिंह दहिया यांनी नरपतकुमार चौधरी यांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांच्याजवळील कागदपत्रे घेतली. तसेच वेळोवेळी कर्ज मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.

२०२० ते २०२३ या कालावधीत त्यांच्या बँकेची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवत त्याचा गैरवापर कर्ज घेण्यासाठी केला. त्या कागदपत्रांचा आधारे वेगवेळ्या बँका व खासगी वित्तीय संस्था असे मिळून सहा कोटी २९ लाख ६१ हजार २८१ रुपयांचे कर्ज घेतले. तसेच ते पैसे स्वतःच्या बँक खात्यात वळते केले. याप्रकरणी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने नरपतकुमार चौधरी यांनी भिवंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून सूरजपाल सिंह चौहान व त्यांच्या २३ साथीदारांसह एकूण २४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील मुख्य सूत्रधार सूरजपाल सिंह चौहान याला शनिवारी भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण म्हसकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT