मुंबई

विजय तेंडुलकर यांचे सामाजिक भान मोठे

CD

विरार, ता. १ (बातमीदार) : कमी शद्बांत लिहून, त्याद्वारे खूप महत्त्वाचे बोलणे, हे विजय तेंडुलकर यांचे गुणविशेष होते. त्यांचे सामाजिक भान वेगळ्या उंचीचे होते, ते माणसे वाचत गेले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले. ते श्रमजीवी संघटनेने उसगाव येथे उभारण्यात आलेल्या विजय तेंडुलकर रंगायतन वजा ॲम्पिथिएटरच्या उद्‍घाटनप्रसंगी बाेलत होते.

नाटककार, लेखक तेंडुलकर यांनी श्रमजीवी संघटनेच्या आरंभीच्या काळात मौलिक साथ दिली. त्यांचे मार्गदर्शन संघटनेसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या नावाने रंगायतनवजा ॲम्पिथिएटर सुरू करून संघटनेने त्यांचे ऋण फेडण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले. या वेळी पंडित यांनी श्रमजीवी संघटनेचे विजय तेंडुलकर यांच्याशी असलेल्या आगळ्या ऋणानुबंधांचे पदर आपल्या भाषणात उलगडले. या वेळी मंचावर ज्येष्ठ कादंबरीकार अशोक समेळ, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, निलीन नाईक, ज्येष्ठ प्रकाशक अशोक मुळे आदी उपस्थित होते.

तेंडुलकरांच्या विविध आठवणींना उजाळा
तेंडुलकरांच्या मते नाटक लिहितो, तेव्हा त्यांच्या मनात प्रयोग असतो. दिग्दर्शक, तंत्रज्ञ नाटक फुलवतात, तेव्हा दुसरा प्रयोग होतो. अभिनेते अभिनयाने नाटक साकारतात, तेव्हा तिसरा प्रयोग तथा प्रेक्षकांनी नाट्यकृती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात प्रयोग झाला, तर तो चौथा प्रयोग, असे झाले तरच ती कृती परिपूर्ण ठरते, अशी आठवण केंकरे यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT