मुंब्र्यात ई-बाइकच्या
बॅटरीचा स्फोट
घरात सुरू होती चार्जिंग; मायलेकी जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : घरात चार्जिंगला लावलेल्या ई-बाइकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मुंब्र्यातील अल्मास कॉलनी येथे घडली. या घटनेत नुसरत सय्यद (वय ४५) आणि हफजा (२४) आणि अफजा (१८) या तिच्या मुली जखमी झाल्या आहेत. तिघीही ३० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या असून, त्यांना मुंब्र्यातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलविले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंब्र्यातील अल्मास कॉलनी येथील सुप्रीम टॉवर या इमारतीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक ५ मध्ये ठेवलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाला, अशी माहिती मोहम्मद अकबर यांनी मुंब्रा अग्निशमन दलाला दिल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवून मायलेकींना रुग्णालयात दाखल केले. तिघींच्याही चेहऱ्याला व हाताला भाजले असून, घरातील वॉशिंग मशीन, कपडे, इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झाले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.