मुंबई

गावरान जांभूळ बाजारातून गायब

CD

वज्रेश्वरी, ता. २ (बातमीदार): निसर्गाच्या लहरीपणामुळे बाजारात रानमेव्याची आवक कमी झाली आहे. अशातच वृक्षतोड, सततच्या अवर्षणग्रस्त स्थितीमुळे यंदा जांभूळ उत्पादनात घट झाली असून, वातावरण पोषक नसल्याने गावरान जांभूळ दुर्मिळ झाले आहेत.
शिरसाड अंबाडी मार्ग तसेच अंबाडी बाजार, वज्रेश्वरी, गणेशपुरी येथील बाजारात जांभूळ दाखल झाला आहे, पण हवामानातील बदलाने आंबा, काजू उत्पादनाप्रमाणे जांभळाचा हंगाम यंदा उशिरा सुरू झाला आहे. सध्या उत्पादीत जांभळाला मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. ग्रामीण भागात सध्या विविध खेड्यापाड्यातून तसेच कर्नाटक सीमेवरील जांभळाची आवक सुरू झाली आहे. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्व यांचे प्रमाण अधिक असते. तसेच जांभळाच्या बियांत ग्लुकोसाईड जांबोलिन प्रकार असल्याने डायबेटीस रुग्णांसाठी ही फळे उपयुक्त ठरतात. त्यामुळे हंगामात जांभळू विक्रीतून २० ते ३० हजारांची कमाई होत असल्याचे विक्रेता सुमन गहला यांनी सांगितले, तर मधुमेहावर जांभूळ अत्यंत गुणकारी असल्याचे डॉ. प्रशांत राठोड यांनी सांगितले.
------------------------------------------------
जुनी झाडे नामशेष
जांभळाची चव गोड-तुरट असून, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या फळाचे महत्त्व आहे. उन्हाळ्याच्या शेवटी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळाची बाजारात आवक होण्यास सुरुवात होते. या फळाचा हंगाम कमी दिवसांचा असतो. वर्षा ऋतूत जांभूळ फळ अमृताप्रमाणे असते, पण वातावरणातील बदलांमुळे तसेच वृक्षतोडीमुळे जांभळाची जुनी झाडे कमी झालेली आहेत. तसेच नवीन प्रजातीच्या झाडांना फारशी वाढ नसल्याने आवक घटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W! पाच चेंडूंत पाच विकेट्स; २६ वर्षीय गोलंदाजाचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, जगातला पहिलाच खेळाडू, Video Viral

Harjeet Singh Laddi: मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अन्...; कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबाराची जबाबदारी स्विकारणारा हरजीत सिंग लड्डी कोण?

धक्कादायक! सहा वर्षांच्या चिमुकलीचं ४५ वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं; तालिबानी म्हणाले, ९ वर्षांची होईपर्यंत वाट पाहा

IND vs ENG 3rd Test: जो रूटला उगाच सिराजने दिली ठसन, फलंदाजाचे कामगिरीतून उत्तर; भारताविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला

Parner Fraud Case : भरमसाठ परताव्याच्या आमिषाला बळी पडून पारनेर श्रीगोंदा व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना सुमारे 3300 कोटींना घातला गंडा

SCROLL FOR NEXT