खारघर, ता. २ (बातमीदार) : खारघरमधील स्पॅगेटी सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर रविवारी कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रहिवाशांमध्ये भीती आहे. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. सुट्टीच्या दिवशी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे आणि काही खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षा रक्षकावर अपोलो रुग्णालयात उपचार करावे लागले.
एप्रिल महिन्यात तळोजातील आसावरी सोसायटीमधील आद्या सिंग या चारवर्षीय बालक तर मेमध्ये खारघर सेक्टर १०मध्ये सायकलिंगसाठी जाणाऱ्या रंजीत जोगी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या घटना ताज्या असताना रविवारी (ता. १) सकाळी नऊच्या सुमारास स्पॅगेटीतील पारिजात इमारतीत कर्तव्यावर असलेल्या नौशाद आलम या सुरक्षा रक्षकावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून चेहरा, पायाला चावा घेतल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोसायटीतील सफाई कामगार असलेल्या महिलेवर कुत्रा धावून गेला. या वेळी महिलेने आरडाओरड केल्याने सुरक्षा रक्षक नौशाद आलम मदतीसाठी गेला असता कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. खाली पडल्यावर नौशादचा चेहरा, पायाला चावा घेतला.
हल्ल्यात जबडा फाटल्याचे निदर्शनास येताच सुरक्षारक्षकास पनवेल महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात नेले, पण रविवार सुट्टी असल्यामुळे ते केंद्र बंद होते. तर सीबीडीतील एमजीएम रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर अपोलो रुग्णालयात उपचार करावे लागले, अशी माहिती सोसायटीमधील रहिवासी विशाल वाघमारे, स्वप्नील शेट्टी यांनी दिली.
महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण विभागातील डॉ. बी. एन. गीते यांच्याशी संपर्क केला असता, कुत्र्यांना पकडून केंद्रात आणले आहे. कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकास उपचारासाठी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे, अशी सांगितले आहे. पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण नियमितपणे केला जात आहे.
रविवारी महापालिकेचे आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नौशाद आलम यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. खारघरमध्ये दोन आरोग्य केंद्रे आहेत. सुट्टीच्या दिवशी दोनपैकी एक सुरू करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त मंगेश यांच्याकडे केली आहे.
- अमर उपाध्याय, पदाधिकारी, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.