मुरबाड, ता. २ (बातमीदार)ः पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ३० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनसंज्ञा लागलेली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने शासनाच्या विविध योजना राबवण्याबरोबर कर्ज घेण्यातही विविध अडचणी येत आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर खासगी वने व वनेत्तर कामास बंदी असल्याची नोंद आहे. त्यामुळे जमीन विकसित करण्यात येणाऱ्या अडचणी, वन विभागाकडून होणारी पिळवणुकीबाबत विधानसभेत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी लक्षवेधी मांडली होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत याच अनुषंगाने बैठक घेतली होती. या बैठकीत गोदरेज बाईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तसेच १९ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील नोंदी रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या खातेदारांना दुसऱ्या टप्प्यात १२ हेक्टर खालील शेतकऱ्यांच्या ३५ सेक्शनच्या नोंदी हटवण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच ३५ सेक्शनखालील जमिनीवर झालेल्या नोंदी रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवणे, यासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करण्याकरिता व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली होती; परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
------------------------------------------
विविध अडचणींचा ससेमिरा
- महाराष्ट्र राज्यातील सुमारे १,६५,९०० शेतकरी खातेदारांच्या जमिनीवरील वन संज्ञेच्या नोंदी रद्द करून त्यांना न्याय देण्याबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते. दरम्यान, अद्यापपर्यंत नोंदी रद्द झालेल्या नाहीत.
- १९७५ साली शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कमध्ये वन किंवा वनेत्तर कामांना बंदी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यास, जमिनीचे रूपांतर बिगर शेती कामासाठी करण्यास बंदी आहे.
----------------------------------------
ज्या शेतकऱ्यांकडे १२ हेक्टरपेक्षा जास्त जमीन होती. त्या जमिनीला वन संज्ञा लागली आहे. त्यानंतर सरकारने छोटे शेतकरी असलेल्यांच्या सातबारा उताऱ्यावर वने अशी नोंद केल्याने कूळ कायद्याने मिळालेल्या जमिनीवर वने अशी नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी मालकीच्या जमिनीवर कोणतीही विकासकामे करणे शक्य होत नाही.
- मारुती कोर, शेतकरी, असोळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.