मुंबई

खाडी किनारच्या इमारतींना धोका

CD

खाडीकिनारच्या इमारतींना धोका
भरतीच्या पाण्यामुळे पाया खचला; कामोठेवासी धास्‍तावले
कामोठे, ता. ९ (बातमीदार) : कामोठे शहरात खाडीकिनारी बांधलेल्या इमारतींचा पाया भरतीच्या पाण्यामुळे खचला जात आहे. कांदळवन क्षेत्रामुळे खाडीकिनारच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसविण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाकडून त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बजेटमध्ये घर मिळत असल्यामुळे मुंबई उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी काही वर्षांपूर्वी कामोठे नोडमध्ये घरे विकत घेतली. वेळप्रसंगी बजेटमुळे खाडीकिनारी असलेल्या इमारतींना त्यांनी प्राधान्य दिले. येथील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हा खाडीकिनारपट्टीचा परिसर मागील १० ते १५ वर्षांत इमारतींनी गजबजून गेला आहे. हक्काचे घर घेतल्याचे समाधान कालांतराने भरतीच्या पाण्यामुळे ओसरू लागले आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी इमारतीवर सतत आढळत असल्याने पाया हळूहळू खचू लागला आहे. सेक्टर ३४ मधील सृष्टी कॉम्प्लेक्सला याची जास्त झळ जाणवत आहे. कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७२ सदनिका आणि १३ गाळे आहेत. १ मार्च २००७ मध्ये बांधकाम व्यावसायिकाने इमारत रहिवाशांना हस्तांतरित केली, त्या वेळी परिसरात सिडकोने ९० फूट रस्ता प्रस्तावित केला होता, मात्र कांदळवन संरक्षण कायद्यातील बदलामुळे रस्त्याचे नियोजन बारगळले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे. सृष्टी कॉम्प्लेक्स व्यतिरिक्त खाडीकिनारच्या रवीरचना, हरी निवास, स्पेस हाइट्स, शिवकृपा, ध्रुव निकेतन, पार्थ, सिल्व्हर ओक, रवी हाइट्स या इमारतींना भरतीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला असल्याची माहिती माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी दिली आहे.
.......................
टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसवण्याची मागणी
भरतीचे पाणी आदळून इमारतीचा पाया खचत चालला आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. सिमेंटने भेगा भरणे, संरक्षण भिंत बांधणे यासारख्या तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र वरवरच्या मलमपट्टीमुळे इमारतीचा धोका कायम असल्याने रहिवासी धास्तावले आहेत. सिडको प्रशासन कार्यवाही करत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी इमारतींच्या आवारात येत असल्याने रहिवाशांच्या जीविताला धोका असल्याची भीती स्पेस हाइट्स कॉम्प्लेक्सच्या अध्यक्ष उज्ज्वला देवरुखकर यांनी व्यक्त केली. सिडको आणि पनवेल महापालिका यांनी संयुक्तपणे सेक्टर ३४, ३५ आणि ३६ परिसराचे सर्वेक्षण तसेच धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरस ऑडिट करण्याची मागणी डॉ. भगत यांनी केली आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर कामोठे खाडीकिनारी टेट्रापॉड सिमेंट ब्लॉक बसवण्याच्या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था...', ट्रम्प यांच्या डेड इकॉनॉमीच्या टीकेनंतर PM मोदींचं मोठं विधान

Top 5 Stock Picks: शेअर बाजार कोसळला तरी हे 5 शेअर्स ठरू शकतात 'Profit Machine'! तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

Karjmafi Explained: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागची खरी गोष्ट... सोप्या भाषेत!

Education Minister : शिक्षणमंत्री पडले बाथरूममध्ये, मेंदूत आढळल्या रक्ताच्या गुठळ्या, प्रकृती गंभीर; राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण

टीआरपी यादीत मोठा बदल! 'घरोघरी मातीच्या चुली'ठरली सगळ्यांच्या वरचढ, तर झी मराठीच्या मालिकेची टॉप १० मध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT