आदिवसी महिलेची अवघड प्रसूती यशस्वी
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे कौतुक
माणगाव, ता. ११ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगावमधील उपजिल्हा रुग्णालयात एका आदिवासी महिलेची अतियश अवघड असलेली प्रसूती यशस्वीरित्या पार पडल्याने तिला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोरगरिब रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. हे उपजिल्हा रुग्णालय कोरोना काळात संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी वरदान ठरले होते. दरम्यान, तालुक्यातील कविलवहाळ आदिवासीवाडी येथील शालीनी वालेकर ही महिला उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिची प्रसूती नैसर्गिक करण्यासाठी डाॅक्टरांच्या टीमने प्रथम कसोटीने प्रयत्न केले, मात्र काही वेळाने रुग्णाची प्रकृती ढासळली. त्यामुळे नैसगिक प्रसूती न करता ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये डॉक्टरांच्या टीमला यश आले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. तो औषधोपचाराने आटोक्यात आणण्यात आला. त्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. दरम्यान, रुग्णाला आकडी येऊ लागली. रक्तस्राव कमी करण्यासाठी गर्भपिशवी काढणे गरजेचे होते, परंतु सीनियर स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सर्जन उपलब्ध नसल्याने रक्तस्राव औषधोपचाराने आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान, रुग्णाला पाच रक्तपिशव्या चढविण्यात आल्या. सर्जनची गरज असल्याने डॉ. गौतम राऊत यांना संपर्क करण्यात आला, परंतु ते कामानिमित बाहेर होते. त्यांनी ऑपरेशन करण्याची तयारी दर्शवली. तर भूलतज्ज्ञ डॉ. सावंत यांनी भूल देण्याची तयारी दर्शवली. रुग्णाचे ऑपरेशनला होईपर्यंत डॉ. श्रुती निकम, डॉ. रामदास तरपेवाड, डॉ. अरुणा पोहरे यांनी कसोटीने प्रयत्न केले. दरम्यान, डॉ. राऊत यांनी ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. त्यानंतर रुग्ण शुद्धीवर आला. त्यामुळे अतियश बिकट अशा परिस्थितीमध्ये महिला रुग्णाची अवघड अशी प्रसूती यशस्वी केल्याबद्दल डॉ. गौतम राऊत, डॉ. श्रुती निकम, डॉ. सावंत व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात येत आहे. या डॉक्टरांच्या टीमचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा पोहरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.