मुंबई

माळशेज घाटात भातपेरणीला वेग,

CD

माळशेज घाटात भातपेरणीला वेग
टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर) : यंदा पावसाला लवकरच सुरुवात झाल्याने माळशेज घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी मेअखेरीसच भातपेरणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी हे काम पूर्णत्वास गेले आहे. पावसाची लक्षणीय उपस्थिती आणि जमिनीतील भरपूर ओलावा यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक व बैलांच्या सहाय्याने पेरणी केली.

राज्य सरकारने १५ जूननंतर पावसाचा अंदाज घेऊन भातपेरणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते; मात्र यंदा मे महिन्यातच मुसळधार पावसाने राज्यात हजेरी लावली. काही भागांत पूरस्थितीही उद्भवली. अशा स्थितीत माळशेज घाट परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वतःच्या अनुभवावर आधारित निर्णय घेत पेरणीचे काम वेळीच सुरू केले. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह विविध पारंपरिक साधनसामग्री बैलजोडी, कुदळ, पंजा यांचा वापर करत शेतीकाम पूर्ण केले. फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, भोरांडे, शिसवेवाडी, भोईरवाडी, फांगणे अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पेरण्या झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. जमिनीला पुरेसा ओलावा आहे आणि वरुणराजा वेळेपूर्वीच दाखल झाल्यामुळे आम्ही पेरणी केली, असे संतोष पारधी, सुदाम भला व किरन कारभळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT