मुंबई

आरक्षण वाढीसाठी शिफारस करणार

CD

आरक्षण वाढीसाठी शिफारस करणार
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के अनुक्रमे आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेपेक्षा छोट्या पालिकांमध्ये अनुसूचित जातीच्या प्रभागांचे आरक्षणाचे प्रमाण अधिक आहे. मुंबई महापालिकेत अनुसूचित जातींचे फक्त १३ प्रभाग (वार्ड) आहेत. समता परिषद मुंबईच्या वतीने माजी मंत्री विजयभाई गिरकर यांनी आपल्या शिष्टमंडळासह धम्मपाल मेश्राम यांना लेखी निवेदन देत ही तफावत निदर्शनास आणून दिली होती. मुंबई पालिकेतील अनुसूचित जातीच्या वॉर्डसंदर्भात माजी मंत्री भाई गिरकर, विविध संघटना, प्रशासकीय अधिकारी यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे बैठक झाली. या बैठकीस विधी व न्याय विभागाच्या सहसचिव अश्विनी सैनी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT