मुंबई

कोपरीतील स्मशानभूमीवरून वाद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : कोपरीतील कन्हैय्यानगर-ठाणेकरवाडी स्मशानभूमीत पक्षी आणि प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच मुंबई पालिकेच्या धर्तीवर राखीव भूखंडावर दहनवाहिनी उभारावी, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने कोपरी येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला आहे, मात्र २०१७ पासून स्मशानभूमीचे काम संथ गतीने सुरू आहे. स्मशानभूमीतील गैरसोयींबद्दल कोपरीतील रहिवाशांमध्ये नाराजी असतानाच प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या संदर्भातील माहिती भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांनी मिळाल्यानंतर बुधवारी स्मशानभूमीबाहेर आंदोलन करण्यात आले. कोपरीतील रहिवाशांसह कोणाचाही प्राण्यांच्या दहनवाहिनीला विरोध नाही, परंतु मानवासाठीच्या स्मशानभूमीतच प्राण्यांचे दहन करण्याचा निर्णय नागरिकांच्या भावनांशी खेळणारा असल्याचा आरोप भरत चव्हाण यांनी केला.
-------------------------------------
थर्ड पार्टी ऑडिटची गरज
कोपरी स्मशानभूमीचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात असून, मूळ स्मशानभूमीऐवजी नवी कामे काढली जात आहेत. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची गरज आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत स्मशानभूमीतच प्राण्यांची दहनवाहिनी उभारून देणार नसल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT