मुंबई

फलाटाचा अंदाज न आल्याने अंध व्यक्ती ट्रॅकवर

CD

अंबरनाथ (वार्ताहर) : रेल्वेस्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक दिव्यांग व्यक्ती रुळावर पडून जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिव्यांगाचे प्राण एमएसएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र सुरक्षा फोर्स (एमएसएफ) जवान अमोल देवरे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्य दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी सिद्धनाथ माने हे वांगणी येथे राहतात. ते २ जूनला संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसटीवरून कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकलची वाट पाहत होते. याचवेळी स्थानकावर लोकल आल्याची घोषणा झाली आणि ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, स्थानकाचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून ते रुळावर कोसळले. माने पडल्याचे निदर्शनास येताच देवरे यांनी सर्वांत आधी लोकल थांबवली. रुळाकडे धाव घेऊन माने यांना तेथून हटवत प्राण वाचवले. या वेळी काही प्रवाशांनीही त्यांची मदत केली. माने गंभीय जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Elections: जागा १, पण ७५ दावेदार! राष्ट्रवादीत तिकीटासाठी महाभारत; निर्णय कधी? निकष सांगत पक्षश्रेष्टींनी वेळच सांगितली

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

SCROLL FOR NEXT