मुंबई

पनवेल महापालिका निवडणुकीचे बिगुल

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : राज्यातील मुदत संपलेल्या ‘ड’ वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पनवेल महापालिकेचीही मुदत संपल्याने प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे महापालिकेत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सद्यस्थिती पाहता या निवडणुकीतही पुन्हा एकदा भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत शेकाप आघाडीच्या तिकिटावर निवडून आलेल्या बऱ्याच नगरसेवकांनी भाजपसोबतच संसार थाटल्याने शेकापला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.
२०१६ ला स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची २०१७ ला पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत महापालिकेच्या ७८ जागांपैकी भाजपने ५१ जागा जिंकल्या; तर शेकापने २३, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले. विरोधी पक्षांमध्ये सर्वांत जास्त जागा शेकापच्या असल्यामुळे प्रीतम म्हात्रे यांच्या रूपाने महापालिकेला पहिला विरोधी पक्षनेता मिळाला. गेली पाच वर्षे महापालिकेचे कामकाज चालल्यानंतर २०२२ला महापालिकेची मुदत संपल्याने तेव्हापासून आत्तापर्यंत प्रशासक राजवट सुरू आहे. या कालखंडात पनवेलच्या राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्षांमध्ये प्रमुख दावेदार असलेल्या शेकापच्या गोटातून सुरुवातीलाच आठ नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याने १५ नगरसेवक उरले होते. त्यापैकी शेकापचे नऊ नगरसेवक आणि काँग्रेसची एक नगरसेविका यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता शेकापमध्ये अवघे सहा नगरसेवक शिल्लक राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत शेकापला आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. शेकापच्या सोबतीला काँग्रेसचाही एक नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने त्यांनाही रिक्त जागेवर नवा चेहरा घेऊन लढावे लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र संसार थाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. त्यापैकी एक जण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षासोबत; तर एकाची भूमिका निश्चित नसल्याने त्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा भाजपची ताकद जास्त वाटत असल्याने या निवडणुकीत भाजप वरचढ ठरेल, असे राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.
--------------------------
भाजपमध्ये अंतर्गत आव्हाने
पनवेल महापालिकेतील एकूण ७८ जागांपैकी भाजपने स्वबळावर ५१ जागा जिंकल्याने या निवडणुकीतही भाजपकडेच त्या जागा राहतील, हे तर निश्चित आहे; मात्र उर्वरित २७ जागांवर विरोधी पक्षातून भाजपविरोधात लढलेले शेकापचे २३ पैकी १७ नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत; तर काँग्रेसमधून एक नगरसेविका भाजपमध्ये आली आहे. त्यामुळे या जागांवर त्याच नगरसेवकांनी दावा केला आहे. नैसर्गिकरित्या भाजपलाही त्यांना संधी द्यावी लागणार आहे. यात याआधीच्या निवडणुकीत शेकापविरोधात लढलेल्या भाजपच्या उमेदवारांची नाराजी भाजपला ओढावून घ्यावी लागणार आहे. ही नाराजी थोपविण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे राहणार आहे.
----------------------
शेकापचा बालेकिल्ला राहणार का?
२०१७ला झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने जरी जास्त जागा जिंकल्या असल्या तरी शेकापने तळोजा, घोटगाव, पेठाली, कळंबोली येथील १२ प्रभागांपैकी ११ प्रभाग जिंकून बालेकिल्ला शाबूत ठेवला होता; मात्र या भागातील नगरसेवकही भाजपने गळाला लावून शेकापला दणका दिला आहे. शेकापला आता या जागांवर पुन्हा तयारी करून अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी लढावे लागणार आहे.
--------------------
आमचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि युवानेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जनतेची कामे करण्यासाठी भाजपमध्ये गेलो आहोत. आगामी महापालिका निवडणुकीत आमच्यासोबत आलेल्या सर्व नगरसेवकांनी पुन्हा त्याच जागेवर संधी मिळेल, असा आमचा दावा असणार आहे; परंतु शेवटी ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला बांधिल असेल.
- गणेश कडू, माजी नगरसेवक, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT