मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवण्याची मागणी

CD

विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या आणि क्षमतेत वाढ करण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांना पत्र देऊन केली आहे.

पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी लोकवस्तीचा असून, विशेषतः डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; मात्र जिल्ह्यातील वसतिगृहांची क्षमता अत्यंत मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर अंतरावर जावे लागते किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून तेथील वसतिगृहांची क्षमता ही अत्यंत अपुरी आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असतानाही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात नव्याने वसतिगृहांची उभारणी करावी व सध्याच्या वसतिगृहांची क्षमता किमान २०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढल्याने तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहाची व्यवस्था करून त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT