मुंबई

गुलाबाच्या रहिवाशांना लागणार शांत झोप

CD

‘मुल्लाबाग’च्या रहिवाशांना दिलासा
ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाच्या संरचनेत बदल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुल्लाबाग परिसराला कोणतीही बाधा न पोहोचवता ठाणे-बोरिवली मार्ग भुयारातून १२५ मीटर पुढे सरकणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी, प्रदूषणाच्या कचाट्यातून मुल्लाबाग परिसराची सुटका झाली असून, परिसराचे सौंदर्य आणि हिरवाईसुद्धा अबाधित राहणार आहे. परिणामी आता येथील रहिवाशांना शांत झोप लागणार आहे.

ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांवर आणणारा प्रकल्प सध्या अनेक कारणाने चर्चेत आहे. प्रकल्पाचा बोगदा ठाणे शहरातील उच्च मध्यमवर्गीय परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुल्लाबाग येथून निघणार असल्याने येथील रहिवाशांची झोप उडाली होती. बोगद्यासाठी होणारा आवाज आणि वाहतुकीमुळे परिसराची शांतता भंग पावली होती. तसेच प्रकल्पाच्या आराखड्यानुसार भविष्यात या ठिकाणाहून ८० हजार वाहनांची रोज वर्दळ होणार होती. त्यासाठी शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार होती. याविरोधात मुल्लाबाग परिसरातील रहिवासी एकवटले आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. वारंवार आंदोलन निदर्शने करीत त्यांनी आपल्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत यासंदर्भात मुल्लाबाग येथील रहिवासी आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेत यावर तोडगा काढला. कोणत्याही प्रकल्पाचा त्रास स्थानिक नागरिकांना होता कामा नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार नवा आराखडा तयार करत ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प मुलाबाग परिसरातून थेट न नेता डोंगरापासून तो भुयारी मार्गे १२५ मीटर पुढे सरकवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प आता येथील सत्यशंकर सोसायटीच्या भिंतीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हा मार्ग पूर्णपणे भुयारी असल्याकारणाने मुल्लाबागचा परिसर जैसे थे राहणार आहे.

रहिवाशांचा जल्लोष
आपल्या आंदोलनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरिवली प्रकल्पासंदर्भात मोठा दिलासा दिल्याने मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. बुधवारी अनेक रहिवाशांनी मंदिरात जाऊन प्रसाद चढवला, तर उद्या गुरुवारी खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात येणार असल्याची माहिती येथील रहिवासी राकेश मोदी यांनी दिली.

राडारोडाबद्दल मोठा निर्णय
ठाणे-बोरिवली प्रकल्प कामामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडी, वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डम्पर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल. त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात राडारोड्यामुळे चिखलही होणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

ट्रेन बुकिंग बनले आणखी सोपे! Cleartrip आणि IRCTC ची पार्टनरशिप; पाहा तिकीट कसं मिळवायचं? एका क्लिकमध्ये

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

SCROLL FOR NEXT