मुंबई

पदविका विद्यार्थ्यासाठीही आता ''शिका व कमवा'' योजना

CD

आता शिकता-शिकता कमवा!

पदविका विद्यार्थ्यांना संधी; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची योजना

मुंबई, ता. ११ : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या विविध पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिका व कमवा’ ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी शिक्षण संस्था आणि उद्योगसमूहांच्या संलग्नीकरणासोबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया मंडळाकडून सुरू केली जाणार आहे. या योजनेतून पदविकेच्या विद्यार्थ्यांना थेट राज्यातील विविध उद्योगसमूहांत काम करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ‘शिका व कमवा’ या उपक्रमाच्या सर्वंकष धोरणास मान्यता दिलेली आहे. या धोरणात नमूद अटी व शर्तीनुसार संबंधित संस्था व सहभागी उद्योगसमूहांनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांकरिता शासनाची मान्यता मिळाली आहे, अशा संस्थांमध्ये शिका व कमवा हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त सर्व पालक संस्थांनी १७ मेपर्यंत तसेच उद्योगसमूह संस्थांनी २१ मेपर्यंत मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित संलग्नता शुल्क व कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योगसमूहासाठी मंडळाकडून स्वतंत्र संलग्नता प्राप्त करणेही अनिवार्य आहे. संलग्नता प्रक्रिया पूर्ण करण्याकरिताची लिंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व सचिव उमेश नागदेवे यांनी दिली.
----
वर्षातून दोनदा नोंदणीची संधी
‘शिका व कमवा’ या उपक्रमाच्या धोरणामध्ये विद्यार्थी नोंदणी वर्षांतून दोन वेळा करण्याची तरतूद आहे. त्यास अनुसरून मंडळाने ही नोंदणी प्रत्येक वर्षी जानेवारी व जूनमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. या विद्यार्थ्यांची नोंदणी मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित कालावधीत पूर्ण करून घेण्याचे आवाहन संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT