मद्यधुंद तरुण ट्रकखाली आल्याने मृत्यू
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जाणारा तरुण ट्रकच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू, तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील उड्डाणपुलावर घडली. या अपघाताला मृत चालक जबाबदार असल्याचे आढळून आल्याने रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रमजान जिंदावली शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून, सुरज प्रकाश गवळी (वय २३) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही ऐरोली सेक्टर-१ साईनाथवाडी येथे राहण्यास आहेत. या दोघांनी सोमवारी (ता. ९) रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले होते. त्यानंतर दोघेही नशेत पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ऐरोली येथून बेलापूरच्या दिशेने निघाले होते. या मद्याच्या नशेत असताना त्यांची दुचाकी ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली येथील रिलायन्स कंपनीसमोरील पुलावर आली असताना, रमजान शेख याने दोन ट्रकच्यामधून पुढे जाण्याचा प्रत्यन केला. या वेळी रमजानचा खांदा ट्रकच्या मागच्या बाजसू लागल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात रमजान शेख हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सुरज गवळी हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात रमजान शेख याने मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीने, वेगात, धोकादायकरित्या दुचाकी चालवून नेल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.