मुंबई

नेरूळ येथे रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

CD

नेरूळ येथे रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
रात्री-अपरात्री जास्‍तीचे भाडे आकारणी; कारवाई करण्याची मागणी
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) ः लवकरच शाळा सुरू होणार असल्यामुळे गावाकडून शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईत विशेषतः नेरूळ एलपी येथे रात्रीच्या वेळी गावावरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते; मात्र रात्री-अपरात्री रिक्षाचालकांकडून येथील प्रवाशांकडून जास्‍तीचे भाडे आकारून त्‍यांची आर्थिक लूट केली जात असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नवी मुंबई शहरात गावाकडून येणाऱ्या नागरिकांकडून रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. एसटी वा खासगी वाहनातून दररोज रात्री नवी मुंबईतील विविध ठिकाणी प्रवासी उतरत असतात. विशेषतः नेरूळ एलपी या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. हे सर्व प्रवासी पहाटे दोन ते तीन वाजल्यापासून शहरात दाखल होत असल्याने त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळत नाही. परिणामी, एलपी नेरूळ येथे उतरून दूरवर असलेल्या उलवे, उरण आणि सीवूड्स येथील घरी जाण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. याचा गैरफायदा एलपी येथे कार्यरत असलेल्या काही रिक्षाचालकांच्या टोळीकडून घेण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अवाजवी भाडे आकारत प्रसंगी अधिक भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांना काही रिक्षाचालक दादागिरी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उलवे येथे जाणाऱ्या प्रवाशांकडून ३०० तर उरणसाठी ४५० रुपये आणि सिवूड्ससाठी २०० रुपये आदी भाडे आकारले जाते. तर नेरूळ क्षेत्र एक आणि दोनमध्ये जाण्यासाठी सुमारे ४० रुपये भाडे होत असताना रिक्षाचालकांकडून ८० रुपये घेतले जातात. अशा रिक्षाचालकांवर आरटीओ आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
...............
नेरूळ एलपीप्रमाणे शहरातील सीबीडी, सानपाडा हायवे, वाशी हायवे, रबाळे नाका, कोपरखैरणे आदी ठिकाणीदेखील रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांकडून आर्थिक लूट होत असून अशांवर नवी मुंबई वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jai Jawan Pathak: अनेक प्रयत्न कोसळले, पण अखेर उभा राहिला १० थरांचा इतिहास, कोकणनगरनंतर जय जवान पथकाची विजयी झेप!

Dahi Handi 2025: ठाकरे बंधुनंतर कार्यकर्त्यांचे मनोमिलनाचे बॅनर, दहीहंडी उत्सवात झळकले एकत्रित फोटो

"मी स्वतःच माझ्या लग्नाची बोलणी केली" गिरीश ओकांच्या लेकीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली..

Latest Maharashtra News Updates : शिर्डीतील साईमंदिरात सोन्याचा त्रिशुळ अर्पण

Kalamb News : मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अद्याप अपूर्ण, एनडीआरएफचे प्रयत्न सुरू

SCROLL FOR NEXT