नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : रुग्णालयात भासणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई मनसेतर्फे सानपाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १५० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. शिबिर सुरू असताना सानपाडा येथील अडीच वर्षीय बाळाला उपचारासाठी तातडीने एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे समजले. हा रक्तगट दुर्मिळ असून तो उपलब्ध होत नसल्याचे संबंधितांमार्फत मनसे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. याची दखल घेऊन रक्तदानासाठी आलेल्यांपैकी एकाचा तो रक्तगट असल्याने ते रक्त तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. या वेळी विनायक अपराज, मनसे अध्यक्ष गजानन काळे, महिला अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सचिन कदम, योगेश शेटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.