मुंबई

उल्हासनगरात नागरिकावर प्राणघातक हल्ला

CD

स्कायवॉकवर एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : नागरिकांच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत, तसेच जलद प्रवास यासाठी रेल्वेस्थानकाला जोडणारे स्कायवॉक बांधण्यात आले; मात्र उल्हासनगरमधील स्कायवॉक आता नशेखोरांचा अड्डा झाला आहे. या स्कायवॉकवरून घरी जाणाऱ्या एका व्यक्तीवर शनिवारी (ता. १४) रात्री हल्ला करण्यात आला. लूटमारीच्या उद्देशाने पाच ते सहा नशेखोर युवकांनी एका व्यक्तीच्या डोक्यात लादी घातली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हरिओम द्विवेदी हे कामावरून घरी परतत होते. उल्हासनगर रेल्वेस्थानकावरील स्कायवॉकवरून जात असताना पाच ते सहा नशेत धुंद असलेल्या तरुणांनी त्यांना अडवले. सुरुवातीला वाद घालून त्यांच्याकडील वस्तू घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला विरोध करताच हल्लेखोरांनी जवळील लादी उचलून हरिओम यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात लुटीच्या उद्देशाने मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नागरिकांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत, स्कायवॉकवरील सुरक्षेसाठी विशेष पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच नशेखोर युवकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT