घाटकोपरमध्ये संरक्षण भिंत कोसळली
संततधार पावसाचा फटका
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने संततधार सुरूच ठेवली आहे. मध्यरात्री पावसाने जोर धरला असताना घाटकोपरच्या इंदिरानगर दोन या भागातील सिद्धेश्वर चाळीत पहाटे तीनच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळली. या चाळीत १० ते १५ घरे असून, दोन घरांजवळ ही भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात दगड पडले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी विजय जायसवाल या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी वा घरांचे नुकसान झालेले नाही. चाळीतील अर्धी सुरक्षा भिंत रात्री कोसळली असून, काही भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. उर्वरित कोसळण्याच्या स्थितीत असलेली सुरक्षा भिंत पालिकेने पाडावी आणि नव्याने सुरक्षा भिंत बांधावी, अशी मागणी या चाळीतील नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.