मुंबई

कशेडी घाटात दरड कोसळली

CD

पोलादपूर, ता. १६ (बातमीदार) ः दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड बोगद्यापासून २०० मीटर अंतरावर दरड कोसळल्याची घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामुळे काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती.
पावसाळ्यामध्ये कशेडी घाटात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. महिनाभरापूर्वीही याच ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रविवारी सायंकाळी पुन्हा दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू होती. घटनेनंतर सुमारे दीड तासाने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्‍वरित घटनास्‍थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

पोलादपूर-कुडपण रस्त्यावर दरड
पोलादपूर तालुक्‍यात रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडपण गावच्या हद्दीमध्ये पोलादपूर-कुडपण या मुख्य रस्त्यावरही मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे. या ठिकाणावरून मार्गक्रमण होताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT