मुंबई

सांडपाणी शिरल्‍याने शेती नापीक

CD

माणगाव, ता. १६ (वार्ताहर) ः दोन दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसाने माणगाव शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी, नाले, गटारे आणि शेतीमध्ये पाणी तुंबले आहे. शहरातील गटारांतून वाहणारे सांडपाणी आणि मलमूत्र खांदाड गावात शिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटाराचे पाणी शेतजमिनीत शिरत असल्‍याने दरवर्षी भातशेती नापीक होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आतापर्यंत गावातील शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. याची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
माणगाव शहरातील मोरबा रस्‍ता, कमल फर्निचर, एसटी बसस्थानक येथील दुतर्फा असलेल्या गटाराचे सांडपाणी आणि मलनिस्‍सारण वाहिनीतील पाणी पावसाच्या पाण्याबरोबर खांदाड गावात येत असल्‍याने सध्या सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मोरबा रस्‍त्‍यावरील गटारांची साफसफाई दोन वर्षांपासून झालेली नाही, त्यामुळे या महामार्गावरील गटारात कचरा साचल्‍याने तुंबले आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्‍याही उपाययोजना न केल्‍याने सांडपाणी जाण्यासाठी मोऱ्यांचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे सांडपाणी उलट फिरून खांदाड गावातील लोकांच्या दारापर्यंत पोहोचते. पावसाचा जोर वाढल्‍यास हे सांडपाणी घरातही शिरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे. सतत पाणी तुंबल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर या समस्‍येवर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्‍थांकडून होत आहे.

तुंबलेल्‍या पाण्यात मगरींचा वावर
माणगाव शहरातील सांडपाणी खांदाड, मोरबा रस्‍ता, बामणोली रस्‍ता येथील शेकडो एकर शेतजमिनीत घुसून दरवर्षी शेती नापीक होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. खांदाड गावातील तुंबलेल्या पाण्यात मगरींचा वावर असल्‍याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी अंधारात मगरींकडून हल्‍ला होण्याची शक्‍यता आहे. शेतात कायमस्वरूपी पाणी तुंबल्याने यंदा शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. पूरनियंत्रण नियम आल्याने घरेही बांधू शकत नसल्‍याने ग्रामस्‍थ हवालदिल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT