मुंबई

घनकचरा निविदा रद्द

CD

तांत्रिक कारणामुळे घनकचरा निविदा रद्द
ठेकेदार न्यायालयात, १८ जूनला सुनावणी
विरार, ता. १५ (बातमीदार) ः वसई विरार महापालिकेत प्रथमच निघालेली निविदा वाटाघाटीनंतर तांत्रिक कारण देत रद्द केली. याविरोधात आता ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली असून, यावर बुधवारी (ता. १८) सुनावणी होणार आहे.
घनकचरा प्रकल्पाची त्रैवार्षिक निविदा रद्द केल्याने वाद निर्माण झाला आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेतील पात्र ठेकेदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे पालिकेने नवीन निविदा प्रकिया राबवली आहे. त्यामुळे घनकचरा निविदा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.
वसई-विरारच्या कचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत असताना आता प्रशासनाच्या भूमिकेने पुन्हा एकदा कचऱ्याचा मुद्दा पेटणार असल्याचे दिसत आहे. घनकचरा विभागातर्फे शहरातील विविध प्रकारच्या साफसफाईसाठी त्रैवार्षिक ठेका काढला जातो. त्यामध्ये दैनंदिन सफाई, चेंबर साफ करणे, घरोघरी जाऊन कचरा उचलणे आणि तो कचराभूमीत नेणे इत्यादी कामांचा समावेश आहे. पालिकेने ऑक्टोबर २०२४मध्ये २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ अशा एकूण तीन वर्षांसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तांत्रिक छाननीत काही ठेकेदार पात्र ठरले होते. त्यांनी इसारा रक्कमदेखील भरली होती. मात्र या निविदेच्या रकमेबाबत वाटाघाटी करण्यासाठी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सुचवले होते. त्यासाठी मेसर्स टंडन समितीकडे वाटाघाटीसाठी बैठक आयोजित केली होती. पात्र ठेकेदारांनी सद्य:स्थितीतील कामाच्या मोबदल्याप्रमाणे काम करण्याची तयारी दर्शविली आणि वार्षिक १० टक्के वाढ देण्याची विनंती केली होती. दरम्यान, निविदा रकमेबाबत वाटाघाटी सुरू असताना पालिकेने तांत्रिक कारण देत निविदा रद्द केली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या आठ ठेकदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे.
पालिकेने निविदा रद्द केल्याने आमचा नैसर्गिक हक्कभंग झाला असून, नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या याचिकेसंदर्भात सुनावणी १८ जून रोजी होणार आहे. तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द करण्यात आली होती. नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती नसल्याने ती सुरू आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या या कारनाम्यामुळे येथील कचरा प्रश्न पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

घनकचरा निविदेबाबत साशंकता
दरम्यान, निविदेला स्थगिती नसल्याने पालिकेने दुसरी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे न्यायालयात याचिका प्रलंबित आणि निविदा प्रक्रिया सुरू, अशी विचित्र अवस्था झाली आहे. तसेच जुन्या ठेकेदारांच्या बाजूने निकाल लागला तर नवीन ठेकेदार दावा करेल आणि पुन्हा निविदा कायद्याच्या कचाट्यात सापडेल. या गोंधळामुळे पुन्हा घनकचरा निविदेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT