मुंबई

लाखोंच्या संख्येने मंत्रालयाला धडक देणार

CD

लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देणार
खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा : २७ गाव सर्वपक्षीय हक्क समितीचा पालिकेसाठी स्वतंत्र संग्राम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. भिवंडीमधील रेती, वीटभट्टी, दगडाचा उद्योग बंद झाल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये २७ गावांतील विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या गावांच्या प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, हे प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने धडक देण्याची आमची तयारी असल्याचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी डोंबिवली येथे केले.
रविवारी डोंबिवलीतील होरायझन सभागृहात २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीची जाहीर सभा पार पडली. या बैठकीला सर्व पक्षांतील, समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेतेमंडळी उपस्थित होते. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, संतोष केणे, रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते. खासदार म्हात्रे हे संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. २७ गाव संघर्ष समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेविरोधात पुन्हा दंड थोपटले असून, कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत न राहता स्वतंत्र पालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
लढा गावापुरता नाही
सुरेश म्हात्रे यांनी सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत केडीएमसीमधून बाहेर पडायचे आहे. गेल्या ४३ वर्षांपासून समिती हा लढा देत आहे. या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून सगळ्यांना भेटून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणुका स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. हा लढा गावापुरता न ठेवता ठाणे, पालघर, रायगडपर्यंत घेऊन जाऊ, असे खासदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.
---------------------------
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनीही सांगितले, ‘२७ गावांच्या संदर्भातील सुनावण्या कोकण आयुक्तांकडे झाल्या होत्या. सर्वांची हरकत असताना २७ गावे बाजूला काढा, परंतु एका आयुक्तांच्या शेऱ्यावर, एका ओळीच्या ठरावावर १८ गावे आणि ९ गावे बाजूला काढली गेली. ही कामे आयुक्तांची ना, मात्र त्यांचा बोलविता धनी कोण याचा शोध घेतला पाहिजे.’
------------------------------
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, ‘महापालिकेने या भागावर वर्षानुवर्षे अन्याय केला. ते पाहून या भागातील नागरिकांना असं वाटतंय की आम्हाला महापालिकेत राहायचं नाही. जुन्या व्यक्तींनी आता तरुणांना संघर्ष समितीत घेतले पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT