माहिम स्थानकातील पादचारी पुलाला धोका
दुर्घटना घडण्याची भीतीः रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज
धारावी, ता.१६ (बातमीदार) ः पश्चिम रेल्वेवरील माहिम जंक्शन स्थानकातून धारावीकडे बाहेर पडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. हा पादचारी पूल धारावीतील स्कायवॉकला जोडला आहे. हजारो प्रवासी या पादचारी पुलाचा स्थानकात येण्या-जाण्यासाठी वापर करतात. गेल्या काही दिवसांपासून स्थानकाबाहेरील तिकीट घराजवळ व पादचारी पुलालागत खोदकाम केले जात आहे. यामुळे पादचारी पुलाचा पाया निखळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी पुलाला धोका निर्माण होऊ नये यासाठी कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. खोदकामा ठिकाणी कोणते काम चालू आहे याची कसलीही माहिती लावलेली नाही. त्यामुळे हे काम रेल्वे प्रशासन करत आहे की पालिका हे समजत नाही. मात्र, या कामामुळे पादचारी पुलाला काही धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पादचारी पुलाला अपघात झाला तरच रेल्वे व अन्य प्रशासन लक्ष देणार का? हल्ली अनेकदा एखादी दुर्घटना घडल्यावरच सरकारी यंत्रणेला जाग येते. या पादचारी पुलाला काही धोका झालाच तर ते प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.