मुंबई

मुर्बी, धामोळे गावातील समस्या मार्गी लावणार

CD

मुर्बी, धामोळे गावातील समस्या मार्गी लावणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आश्वासन
खारघर, ता. १६ (बातमीदार) : सिडकोकडून मुर्बी ग्रामस्थांसाठी भूखंड, संत रोहिदास समाजासाठी मंदिर आणि धामोळे पाड्यातील भाजीविक्रेत्यांना कायमस्वरूपी मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुर्बी आणि धामोळे ग्रामस्थांना दिले.
सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर खारघर शहर निर्माण केले. दरम्यान, परिसरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावामध्ये समाजमंदिर नसल्यामुळे लग्नकार्य असो व इतर कार्यक्रम करण्यासाठी जागा किंवा खासगी सभागृह भाड्याने घ्यावे लागते. त्‍यामुळे मुर्बी गावातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकूर यांच्या पुढाकाराने १३ जून रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित मुर्बी ग्रामस्थांनी गावासाठी समाजमंदिर व्हावे, यासाठी अनेक वेळा सिडको आणि पालिकेकडे पत्रव्यवहार केला. या वेळी सिडकोचे तत्कालीन सहव्यस्थापकीय संचालक दिलीप ढोले व इतर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर भूखंड उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र त्यांची बदली झाल्यामुळे समाजमंदिराचा प्रश्‍न जैसे थे आहे. तसेच खारघरमध्ये व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महाराज मंदिर व सभागृह उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यमंत्री दरबारी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र अद्याप त्‍याबाबतीत ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच पालिकेकडून चर्मकार व्यवसायासाठी स्टॉल परवाना मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, धामोळे पाड्यातील पाणी समस्या दूर करून भाजी व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामविकास भवन येथे कायमस्वरूपी मार्केट उपलब्ध करून देण्यात यावे, अशा विविध समस्यांविषयक या वेळी चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT