मुंबई

Fwd: धारावी मुख्य रस्त्यावरील पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाही

CD

पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाही
पालिकेच्या भोंगळ कारभारावर नागरिक संतप्त
धारावी, ता.१५ (बातमीदार) : धारावी मुख्य रस्त्यावर पालिकेचा दवाखाना आहे. आसपासच्या विभागातील रहिवाशांना छोट्या-मोठ्या आजारांसाठी या दवाखान्याची मोठी मदत होते. धारावीतील सात विभागात असे सात दवाखाने आहेत. मात्र, या दवाखान्यांमध्ये अनेकदा डॉक्टर नसणे, काही औषधे वेळेवर उपलब्ध नसणे अशा अनेक अडचणींना स्थानिकांना तोंड द्यावे लागत आहे.
धारावीतील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीमुळे खासगी डॉक्टरकडे जाणे परवडत नाही. त्यामुळे असे रहिवासी पालिकेच्या दवाखान्यात येतात. पालिकेच्या दवाखान्यातील उपचारामुळे रुग्णाला फरक पडतो, असा विश्वास असल्याने स्थानिक रहिवासी पालिकेच्या दवाखान्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. परंतु, शनिवारी (ता.१४) धारावी मुख्य रस्त्यावरील (बडी मशिदीसमोरील) पालिकेच्या दवाखान्यात रुग्ण विविध समस्या घेऊन येतात. मात्र, दवाखान्यात डॉक्टरच हजर नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक परत जात होते. पालिकेच्या या भोंगळ कारभारावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.
पालिका प्रशासनाने अनुपस्थित डॉक्टरच्या जागी दुसरा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असताना असे होत नाही, असा सवाल स्थानिक रहिवासी व समाजसेवक पारी राजन यांनी केला आहे.

चौकशी करण्याचे आदेश
मी माहिती घेतो आणि पुढील कार्यवाही करतो. यासाठी मी माझ्या सहाय्यक आरोग्य अधिकारी यांना चौकशी करण्यास सांगितले आहे, असे ग/उत्तर पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळासाहेब कवळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Updates: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली!

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT