मुंबई

जुन्या गणवेशात विद्यार्थ्यांची हजेरी

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : नवीन शैक्षणिक वर्षानुसार आजपासून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा सुरू झाल्या; मात्र गेल्या वर्षी उशिराने मिळालेल्या गणवेशात विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गेला. या वर्षीचे नवे गणवेश चालू वर्षात मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या निधीतून नवी मुंबई महापालिकेतर्फे पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, शालेय साहित्य, बूट आणि डबा मोफत पुरवठा केला जातो; मात्र गेल्या वर्षी शालेय गणवेश वाटप करण्यासाठी प्रक्रिया बदलण्यात आली. तसेच महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना उशिराने मिळालेला कार्यादेश, साहित्याचा नमुना अहवाल आदी बाबींमुळे गणवेश वाटप करण्यात कमालीची दिरंगाई झाली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील गणवेश विद्यार्थ्यांना वर्षअखेरच्या महिन्यात असताना मिळाले. त्यामुळे आज महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या अंगावर नवे गणवेश दिसून आले; मात्र हे गणवेश गेल्या वर्षातील असून नव्या वर्षाचे गणवेश वाटप अद्याप सुरूच झालेले नाही. नव्या वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त संघरत्न खिल्लारे यांनी दिली.
------------------
नवागतांच्या पायांचे ठसे
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नेरूळ गाव येथील शाळा क्रमांक १० येथे शाळा प्रवेशोत्सव समारंभास उपस्थित राहून गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या वेळी लेझीमच्या तालावर, ढोल-ताशांच्या गजरात प्रवेशद्वारापासून शाळेच्या इमारतीपर्यंत नवागत विद्यार्थ्यांना मिरवणुकीद्वारे वाजत गाजत आणून त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कागदावर उमटवून त्यांचे शाळेतील पहिले पाऊल संग्रहित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पहिली ते आठवीच्या मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
---------------
पहिल्या दिवशी महापालिकेच्या सर्व ८० शाळांमध्ये उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी शाळा क्र. ९२ कुकशेत येथे तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी शाळा क्र. १ बेलापूर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. शिक्षण विभागाच्या उप आयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागप्रमुख, अधिकारी यांनी आपल्याला नेमून दिलेल्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत केले.
--------------------
एआय तंत्रज्ञानाची तोंडओळख
नेरूळ येथील शाळा क्रमांक नऊ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी उपायुक्त स्मिता काळे यांनी एआय तंत्रज्ञानाची तोंडओळख करून दिली. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली. यामध्ये एआयच्या माध्यमातून नवीन भाषा, तंत्रज्ञान, गणित, कथा याविषयी सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता सर्व शाळांमध्ये नानाविध गोष्टी करण्यात आल्या. गुलाबाची फुले, चॉकलेट, रांगोळी सजावट, वर्ग सजावट, शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, सेल्फी पॉइंट, लेझीमच्या तालावर ढोल-ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत, पुस्तक पालखीचे आयोजन करून शालेय आरंभ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT