मुंबई

ठाण्याचा पाणीपुरवठा उद्या २४ तास बंद

CD

ठाण्याचा पाणीपुरवठा
उद्या २४ तास बंद
‘स्टेम’ दुरुस्ती कामासाठी शटडाऊन

ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे १८ ते १९ जूनला सकाळी नऊ वाजल्यापासून २४ तास बंद राहणार आहे. याचा परिणाम ठाण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणार आहे. शहरातील काही भागांना १२ तास पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे. दुरुस्तीनंतरही दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, ठाणेकरांना टंचाई भासू नये, म्हणून पालिका जुन्या पद्धतीने पाणीपुरवठा करणार आहे.

घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी (ता. १८) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागांचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
---
भिवंडीतही ‘पाणीबाणी’
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेमने सोमवारी दुरुस्ती काम हाती घेतल्याने पाणीपुरवठा बाधित होणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी रात्री ९ या काळात शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT