मुंबई

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेट्रो-१च्या प्रवाशांचा खोळंबा

CD

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेट्रो-१च्या प्रवाशांचा खोळंबा
ओव्हरहेडवर ताडपत्री पडली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर सोमवारी (ता. १६) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा खोळंबा झाला. घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर आझाद नगर मेट्रो स्थानकानजीक ओव्हरहेड वायरवर ताडपत्री पडल्याने सुमारे अर्धा-पाऊणतास मेट्रो सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मुंबईत रात्रीपासून धुव्वाधार पाऊस कोसळत असतानाही मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे; मात्र आज दुपारी १२.४७ वाजता आझाद नगर स्थानक येथे नजीकच्या बांधकाम साईटवरून वाऱ्यामुळे उडून आलेली प्लास्टिकची ताडपत्री ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे वर्सोव्याच्या दिशेने जाणारी मेट्रो वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे मेट्रो गाड्यांच्या एकामागे एक अशा रांगा लागल्या होत्या. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने तत्काळ धाव घेत सव्वाएकच्या सुमारास ताडपत्री काढल्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT