वाशी येथील जागृतेश्वर मैदान येथील सभा मंडपाचे लोकार्पण
नवी मुंबई, ता. १६ ः वाशी येथील जागृतेश्वर मैदानात उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या सभा मंडपासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्यात आले होते. यावेळी आमदार मंदा म्हात्रे पुढे म्हणल्या की, वाशी गावातील जागृतेश्वर मैदानामध्ये अनेक मैदानी खेळ होत असतात. तसेच या मैदानात विविध प्रकारच्या स्पर्धादेखील आयोजित केल्या जातात. परंतु मैदानामध्ये सभा मंडप नसल्यामुळे वाशी गावातील स्थानिक खेळाडूंना लाकडी मंडपासाठी पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे वाशी गावातील स्थानिक खेळाडू प्रवीण भगत आदींनी सभा मंडपासाठी मागणी केली होती. त्यानुसार मंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी महापौर अनिल कौशिक, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, मंगेश चव्हाण, दलविंदर सिंग, वाशी गावातील स्थानिक नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.