मुंबई

बदलापूरकर प्रवाशांचे छपराविना हाल

CD

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २१ : होम प्लॅटफॉर्मच्या निर्मितीपासूनच बदलापूरकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानकावर छप्पर नसल्याने मुसळधार पावसात हातात छत्री घेऊन गाडीची वाट पाहावी लागत आहे. एवढेच नाही तर ऐन गर्दीत छत्री हातात घेऊन चढउतार करत जीवाचे हाल बदलापूरकरांना करावे लागते. त्यामुळे अजून किती पावसाळे आम्ही असेच काढायचे? असा प्रश्न प्रवासी करत आहेत.
२०१९मध्ये ऑनलाइन भूमिपूजन करून सुरू झालेले होम प्लॅटफॉर्मचे काम अद्यापही पूर्ण नाही. त्यात फलाट क्रमांक एकवरून होणारी मोठी गर्दी पाहता होम प्लॅटफॉर्म हे गर्दीचे विभाजन करण्यासाठी बांधले जात असल्याचे आधी रेल्वे प्रशासन आणि राजकीय मंडळींनी सांगितले. मात्र, पुढे नवे तंत्रज्ञान वापरून उद्‍वाहक, सरकते जीने या सुविधा देऊन स्थानक अद्ययावत करण्याच्या नावाने बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांवर अक्षरशः धूळफेक केली. फलाट क्रमांक एक एप्रिलमध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आले. त्यानंतर बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवासाचा खरा संघर्ष दिसू लागला. प्रशासन आणि राजकीय मंडळींच्या भूलथापांना बळी पडलेल्या बदलापूरकरांना आजच्या घडीला होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण नसल्याने गैरसोईंचा सामना करावा लाकत आहे. फलाटावर छप्पर नसल्याने हातात छत्री घेऊन ऐन गर्दीत लोकलमध्ये चढताना मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे.


फलाट एक का बंद केला?
स्थानकावर सरकते जिने, उद्‍वाहक, डेकचे काम सुरू आहेत. त्यात होम प्लॅटफॉर्मचे कामही पूर्ण झालेले नाही. इतर बांधकाम साहित्य या होम प्लॅटफॉर्मवर ठेऊन काम केले जात आहे. यातूनच प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. त्यात होम प्लॅटफॉर्मवर छप्पर नसताना फलाट क्रमांक एक बंद करण्याची घाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिला प्रवाशांचे हाल
संपूर्ण होम प्लॅटफॉर्मवर बांधकाम सुरू आहे. मधल्या प्रथम दर्जा डब्याच्या ठिकाणी आणि काही सर्वसाधारण डब्यांच्या वरील डेकचे काम पूर्ण असल्याने तेवढ्या भागात छताचा आधार मिळतो. पण, इतर काही डबे आणि त्यात मुख्य म्हणजे महिलांसाठी मधला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील बाजूच्या टोकावरील पहिल्या डब्याच्या वर छप्पर नसल्याने महिला प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यात साड्या सांभाळून, कुठे कडेवर लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना भर पावसात छत्री सांभाळून लोकलमध्ये चढावे लागत आहे.

तात्पुरत्या छप्परची सोय करण्याची मागणी
रेल्वे प्रशासनाने नेहमी बदलापूरच्या प्रवाशांना गृहितच धरले आहे. आधीच रेल्वे फेऱ्या कमी त्यात रोज धावपळ करत सकाळी ऑफिस गाठायचे. सायंकाळी घर गाठायची घाई आणि या सगळ्यात छप्पर नसल्याने भर पावसात छत्री घेऊन गाडीत चढण्याची कसरत यामुळे बदलापूरकर वैतागले आहेत. निदान यात थोडासा दिलासा म्हणून होम प्लॅटफॉर्मवर पावसाळ्यापुरते तात्पुरते छप्पर बसवण्याची मागणी बदलापूरकर करत आहेत.

सुविधाशून्य बदलापूर रेल्वेस्थानकाचा मोठा त्रास होतो. अरुंद जिने, पादचारी पूल, अरुंद होम प्लॅटफॉर्म त्यात छप्पर नसल्याने हातात छत्री घेऊन लोकलमध्ये चढायला रोज तारेवरची कसरत करावी लागते. त्यात होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण नसताना फलाट क्रमांक एक बंद करण्याची घाई केल्याने संताप येत आहे. आंदोलन केले तर गुन्हे दाखल होतील या भीतीने आम्ही मुकाट्याने हे सहन करत आहोत.
- दशरथ जाधव पाचलकर, प्रवासी

बदलापूरसाठी गाड्या वाढवा. रेल्वे समस्यांनी हैराण बदलापूरकराने आवाज उठवला की, गुन्हे दाखल करण्याच्या भीतीने तो दाबला जातो. मग आम्ही काय किड्या-मुंग्यांसारखे जगायचे का? घरच्यांना रोज भीती सतावते की, जीवघेण्या या प्रवासातून आमचा माणूस सुखरूप घरी पोहचेल का? निदान तात्पुरते छप्पर बसवून आम्हाला थोडा तरी दिलासा द्या.
- नीलेश तांबे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT