मुंबई

क्षणात खून, तासात अटक!

CD

पाठलाग


नवनीत बऱ्हाटे

मध्यरात्रीचे दीड वाजले होते. गवबाई पाड्यावर जागरण-गोंधळ आटोपून पंकज निकम हा तरुण घरी परतत होता. मात्र, वाटेतच किरकोळ वादातून त्याच्यावर धारदार हत्याराने थेट गळ्यावर घाव करण्यात आला आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. ही थरारक हत्या केवळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरवून गेली. पण उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा तपास लावला. आणि कल्याण रेल्वे स्थानकात पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

-------------------------------

पोलिसांचे ‘ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन’द्वारे उल्हासनगर शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होता. याच काळात एका मध्यरात्री शांतीनगर परिसरात गवबाई पाड्यावर जागरण-गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. पंकज निकम हा २९ वर्षीय तरुण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरी परतत होता. त्याच परिसरातील सचिन डिगे ऊर्फ बबल्या याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या क्षुल्लक वादातून सचिनने थेट पंकजच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात ठेवत अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. घटनास्थळी मदतीला कोणीही नसल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन पंकजचा तिथेच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना केवळ काही क्षणांत घडली. नागरिकांनी आवाज ऐकून पोलिसांना कळवले, तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केला.
प्रकरणाचा तपास मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांच्यासह उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांचे पथक समांतर पद्धतीने करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, सहाय्यक निरीक्षक बबन बांडे, हवालदार सतीश सपकाळे, सुरेश जाधव, शिपाई अर्जुन मुत्तलगिरी यांनी रात्रभर तपासाचे चक्र सुरू केले. यासाठी गुप्त बातमीदारांचे जाळे पसरवण्यात आले. शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. परिसरातील सर्व संशयितांच्या फोनची ठिकाणे ट्रॅक करण्यात आली. या तपासातून एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती म्हणजे सचिन डिगे कल्याण रेल्वे स्थानकातून पलायन करण्याच्या तयारीत होता.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पातळीवर तातडीची बैठक झाली आणि खास सापळा रचण्याचा निर्णय झाला. त्वरित पथक नेमण्यात आले आणि कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवली. अत्यंत संयम आणि रणनीतीने काम करत, पोलिस पथकाने सचिनला ओळखले आणि काही क्षणांतच त्याला अटक केली. हा पाठलाग अत्यंत थरारक होता. कारण, पोलिसांना खात्री नव्हती की आरोपीकडे हत्यार अजूनही आहे की नाही. स्थानकावर नागरिकांची वर्दळ असतानाच सावधगिरी बाळगून, त्याच्या पलायनाच्या आधीच पोलिसांनी त्याला गजाआड केले. एका चित्रपटाला शोभेल असा थरार कल्याण रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला.
संपूर्ण घटनेनंतर सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; पण अवघ्या काही तासांत आरोपीला अटक झाल्याने पोलिसांवर विश्वास परत मिळवण्यात यश आले. गुन्हेगार कितीही शिताफीने पलायनाचा प्रयत्न केला, तरी पोलिसांचा पाठलाग त्याच्याही एक पाऊल पुढे असतो.

समन्वयामुळे कारवाई यशस्वी
संपूर्ण कारवाई ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, उपआयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. त्यांच्या समन्वयामुळे गुन्हे शाखेला अचूक माहिती, पोलिस फोर्सचे बळ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळत राहिले. ज्यामुळे ही कारवाई सुरळीत आणि यशस्वी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT