मुंबई

कातकरी समाजाच्या दोन आश्रमशाळा पुन्हा सुरू

CD

विरार, ता. २२ (बातमीदार) : राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने पालघर आणि रायगड जिल्ह्यातील बंद केलेल्या दोन शासकीय प्राथमिक आश्रमशाळा या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येणे सोपे जाणार असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात विविध ठिकाणी बंद झालेल्या पाच शाळा पुन्हा सुरू करण्याची विनंती राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली होती. त्यावर २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन शाळा पुन्हा सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. जानेवारीत पुन्हा पंडित यांनी मुख्यमंत्र्यांनी सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांना याबाबत स्मरण पत्र देत बैठकीतील निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत निवेदन केले होते. आता औपचारिक शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार पालघरच्या वसई तालुक्यातील खर्डी आणि रायगडच्या कर्जत तालुक्यातील कळंब येथील शाळांमधील पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून नैसर्गिक वर्गवाढ देण्यात येणार आहे.

विवेक पंडित यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, कातकरी समाजासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. अनेक वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या समाजासाठी ही पुन्हा सुरू होणारी शाळा आशेचा किरण ठरेल. या निर्णयामुळे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर शिक्षणाची संधी मिळणार आहे, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

रिक्त जागांवर अनुसूचित जमातीतील विद्यार्थी
१८ जूनच्या या निर्णयानुसार, कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. रिक्त जागांवर इतर अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था प्रतिनियुक्ती/समायोजनाने केली जाणार आहे. तसेच इमारतीसाठी शासकीय जागा वापरण्याचे आणि गरज असल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : भारतात एस-४०० पेक्षाही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित होणार...पंतप्रधान मोदींकडून ‘सुदर्शन चक्र मिशन’ची घोषणा

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

Latest Marathi News Live Updates : सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात फडकावला तिरंगा

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

SCROLL FOR NEXT