मुंबई

डोंबिवलीत रानभाज्या महोत्सव

CD

डोंबिवलीत रानभाज्या महोत्सव

डोंबिवली, ता. २२ (बातमीदार) ः सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांच्या विक्रीसाठी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सलग सात ते आठ वर्षे हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाला मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. सुमारे २० ते २५ प्रकारच्या रानभाज्या या प्रदर्शनास विक्रीसाठी होत्या. या भाज्या जून महिन्यातच मिळतात.

काही महिलांनी रानभाज्या आणि भाकरी बनवून आणल्या होत्या, जेणेकरून भाज्यांची चव कळावी. तसेच या रानभाज्या आरोग्यवर्धक असल्याने ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी केली होती. या वेळी रानभाज्या कोणत्या प्रकारच्या आहेत, रानभाज्या बनवण्याची पद्धत याविषयीसुद्धा माहिती ग्राहकांना देण्यात आली. याचबरोबर महिलांनी घरगुती मध, तेल, मोहरच्या फुलांनी बनवलेले लाडू, टोपल्या अशा अनेक प्रकारच्या बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. या प्रदर्शनाला खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची उपस्थिती होती. दरवर्षी रानभाज्या प्रदर्शन व विक्री हा कार्यक्रम सुभेदार कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात येतो. जंगलातील पौष्टिक भाज्या, अन्न ज्याच्यावर अनेक समूह जगत आहेत, याची माहिती शहरातील बांधवांना माहिती व्हावी, हा उद्देश आहे, असे हिंदवी तुळपुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT