मुंबई

दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल

CD

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांचे आणि रुग्णालयांचे फेरे मारावे लागतात. मात्र, आता ही त्रासदायक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिर घेेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे एकाच दिवशी त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह दिव्यांग प्रमाणपत्र मिळत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या पुढाकाराने ही संकल्पना राबवली जात आहे. या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे दिव्यांगांना वेळ व पैशांची बचत करत तत्काळ सेवा देणे आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या नागरिकांचे कागदपत्रे योग्य असल्यास त्याच दिवशी त्यांच्या हाती अधिकृत प्रमाणपत्र सोपवले जाते. गेल्या बुधवारच्या शिबिरात एकूण ८९ दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामुळे या नागरिकांना शासकीय योजना, आरक्षण, आरोग्य सेवा, प्रवास सवलती यांसारख्या विविध सुविधा सहज मिळणार आहेत. शिबिरासाठी रुग्णालयात स्वतंत्र काउंटर, नियुक्त वैद्यकीय टीम आणि नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नागरिकांना विनाकपात सेवा देण्यासाठी सर्व पथक संवेदनशीलतेने काम करत आहे.

कर्मचाऱ्यांकडून दिव्यांगांच्या गरजांना प्राधान्य
डॉ. मनोहर बनसोडे यांनी या सेवेला केवळ वैद्यकीय काम म्हणून न पाहता सामाजिक दायित्व म्हणून हाताळले. त्यांच्या प्रेरणेमुळे संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या गरजांना प्राधान्य देऊन काम केले आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग समाजाला नव्या आशेचा किरण दिसत आहे. ही योजना इतर शहरांनीही अनुकरण करावी, अशी अपेक्षा अपंग संस्था अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केली.

दिव्यांग बांधवांसाठी सेवा ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. प्रमाणपत्रासाठी अनेक वेळा लोकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागते. त्यात वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढतो. या प्रक्रियेला अधिक सोपे, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. दर बुधवारी होणाऱ्या शिबिरातून एकाच दिवशी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न आहे. आमची टीम संवेदनशीलतेने आणि समर्पितपणे या सेवा पोहोचवते.
- डॉ. मनोहर बनसोडे, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Mumbai-Pune Expressway : चालकांची नियम मोडण्यात ‘द्रुतगती’, तब्बल २७ लाख वाहनांवर कारवाई; ४७० कोटींचा दंड, ५१ कोटी वसूल

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

काय सांगता? 'तारक मेहता...' मधील माधवी भाभी चेन स्मोकर आहे? म्हणते- मला काहीही फरक पडत नाही...

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT